शैक्षणिक अर्हता
Education

डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांचे शालेय शिक्षण निर्मला माता मुलींची शाळा माणिकपूर वसई येथील मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. 1973 साली मॅट्रिकच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम वर्गात सर्वप्रथम आल्याने त्यांना तत्कालीन शिष्यवृत्त्या मिळाल्या.
1977 यावर्षी ‘विद्यावर्धिनी’ संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून मराठी आणि मानसशास्त्र या विषयात B.A. पदवी प्राप्त केली.
1979 साली मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात M.A. पदवी प्राप्त झाली.
1980 मध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या हिंदूजा महाविद्यालयातून D.H.E(Diploma in Higher Education) ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. 1988 साली M.Phil या पदवीसाठी डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंडिता रमाबाई यांचे समग्र साहित्य‘ या विषयावर मुंबई विद्यापीठाला शोधनिबंध सादर केला आणि ती पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. 1998 साली ‘ज्ञानोदय’मधील निबंध- निबंध वाङ्मयाचा पूर्वरंग (1842-1874) या विषयावरील प्रबंधाचे लेखन डॉ. उषा माधव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आणि विद्यावाचस्पती (Ph.D) ही पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठाचे उच्चविद्याविभूषित असे हे व्यक्तिमत्त्व आहे.