बालपण

Childhood

डॉ. सिसिलिया यांचा जन्म 23 एप्रिल 1956 रोजी वसई येथे झाला. मराठी भाषक रोमन कॅथोलिक ख्रिस्ती कुटुंबात येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार उच्च मूल्यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. अनेक प्रकारच्या संघर्षातून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. आईवडलांकडून मिळालेला संवेदनशीलतेचा वारसा, वसईचा इतिहास आणि सुरम्य निसर्ग तसेच आंतरधर्मीय सुसंवादाचा धागा, अभ्यास, संशोधन यातून लेखनास प्रेरणा मिळाली.